प्रिय ..काल तीस वर्षे झाली आपल्या सहजीवनाला खरेच विश्वासच बसत नाहीये .असे वाटते काल का परवा तर झालेय आपले लग्न ..!सावरीच्या नाजुक अलवार कापसा सारखे उडाले नाही हे दिवस ..आपल्या प्रथम भेटीतच जाणवला होता मला तुझा “उमदा “स्वभाव का कोण जाणे पहिल्या भेटीतच खात्री झाली होती माझी की तु मला खुप सुखी ठेवशील तशी फारशी काही अपेक्षा नव्हती माझी जोडीदारा विषयी ..पण त्या अपेक्षांच्या पलीकडे जावून खुप भरभरून दिलेस मला सारे काही तु ..!!ही सगळी खट्टी मिठ्ठी ..(खट्टी कमी आणी मिठ्ठी .जास्त )..वर्षे खूप आनंदात गेली तसे तर सामान्य माणसासारखेच होते आपले ही आयुष्य .पण अनेक अडचणी मधून सुद्धा तुझी भक्कम साथ फार