नुकतंच हाफ पँटमधून आम्ही फुल पँटमध्ये आलो होतो. आमचा दहावीचा वर्ग दुसऱ्या मजल्यावर असायचा, आणि तिसऱ्या मजल्यावर सगळे जुनिअर कॉलेज म्हणजे अकरावी आणि बारावीचे वर्ग भरायचे. जुनिअर कॉलेजच्या वर्गात नवीन बेंचेस आणि ब्लॅकबोर्ड बसवले आहेत, असं माझ्या मित्रांनी सांगितलं. आर्ट्स आणि कॉमर्सचे वर्ग सकाळीच भरायचे, त्यामुळे त्यांचे वर्ग दुपारनंतर मोकळे असायचे. आम्ही सगळे मित्र डबा खाल्ल्यानंतर बेंच बघायला तिसऱ्या मजल्यावर एका वर्गात गेलो. तिसऱ्या मजल्यावर वर्गामध्ये थोडा वेळ बेंच आणि बोर्ड पाहिल्यानंतर माझे सगळे मित्र वर्गाच्या बाहेर पळू लागले.मला काही कळायच्या आतच सरांनी माझ्या शर्टाची कॉलर पकडली आणि पाटीवर जोरात फटका मारला.त्याच वेळी मागून आवाज आला: "नालायकांनो! लाज वाटत नाही