उत्तराधिकारी अनिरूध्दची फिएस्टा कुडोपी फाट्यावरून आतवळली नी कुपेरीच्या डोंगर कुशीत मठाचं गोपूर स्वच्छ दिसू लागलं… कच्चकन ब्रेक लावीत अनिरूध्दनं हात जोडले. ब्रेकलावताच ‘सारे जहाँसे अच्छा’ चीधुन वाजली.अकरा वर्षापूर्वी एस.एस.सी.ला ९४.२३ टक्केगुण मिळवून बोर्डात पहिला आलेला अनिरूध्द धुवट पांढऱ्या पिशवित कपडे भरून मुंबर्इ गाडीची वाट पहात बसलेला. झीरोकट केस,भ्रुकुटी मध्यात अष्टगंधाची टिकली,खाकी पँट पांढरा शर्ट असा शाळेचा गणवेश घालून रूपारेल कॉलेजमध्ये दाखल झालेला भिक्षुकाचा मुलगा.‘हॅलोभटजी काका,रामपुर का लक्ष्मण’ असं जोरदार स्टंपींग झालं. ते आठवून त्याला हसू आलं.पुढे एम.एस्सी.ला फिजिक्समध्ये युनिव्हर्सिटीत फर्स्ट आल्यावर झालेला सत्कार,हराज्यपालानी केलेलं कौतुक, विचारपूस.ह“आय विल रिमेंबर यु यंगकिड… व्हेअर इज दिस कुडोपी?” अयाचित वॄत्तीने भिक्षुकी करणारे