पोलिसांचं वागणं अजबच बाई? *पोलीस...... पोलिसांवर कधीकधी शंकाच घेतली जाते. कारण त्यांचं वागणं. त्यांचं वागणं कधीकधी एवढं अजब असतं की त्यांच्यावर सहजच शंका निर्माण होत असते यात शंकाच नाही. मग एखादी महिला पोलिसांवर ताशेरे ओढत त्यांचं वागणं अजबच बाई असे म्हणायला कचरत नाही. म्हटलं जातं की अकस्मात अपराधाची स्थिती उत्पन्न होत असेल तर एकशे बारा क्रमांकावर फोन करावा. मुलांच्या बाबतीत काही समस्या असल्यास एक हजार अठ्ठ्यानव या क्रमांकावर फोन करुन लावावा. पोलीस येतात व अपराध टळतो. त्यातच पोलीस कन्ट्रोल रुमचाही क्रमांक लावावा. परंतु कधीकधी असा क्रमांक लावूनही उपयोग नसतो. जेव्हा तो कामात येत नाही. कधी पुरावा