कमलाकर," त्याचे प्रण आज पुर्ण होणार , तू शंभरावा आहेस . सखाराम तो शैतान पुन्हा नव्या ताकतनीसी ( ताकदीने) जिवंत होणार व ह्या पृथ्वीतलावर हाहाकार माजवणार . तुला आम्ही वेळीच सावध केले आहे , तू लवकरात लवकर इथून पळ , थोड्याच वेळात तो इथे येईल ."असे म्हणत तो कमलाकरचा आत्मा नाहीसा झाला , त्याच बरोबर सर्व आत्मे नाहीसे झाले . ते सर्व मिळून त्या श्वेतकमलच्या शैतानी शक्तींचा सामना करू शकत नव्हते , बहुतेक त्यांना पुढील संकटाची चाहूल लागली असावी . ते सर्व आत्मे क्षणात तिथून नाहीसे झाले . सखारामच्या हातापायाला कंप सुटला होता . श्वेतकमलची हकीकत