भाग 57सर्व परिस्थिती राम सुद्धा पाहत होता... त्याला हळहळ वाटायची लीला यांच्याकडे पाहून.... एकप्रकारे तो त्यांचा मानसपुत्रंच होता पण आज त्याची ही माता त्याच्याशी जवळपास तीन महिने झाले बोलत नाही हे बघून त्यालाकासाविस व्हायचे....पण आता मात्र..... त्याने....बोलायचे ठरवले बाबाराव यांच्यासोबत......बाबाराव संध्याकाळच्या सुमारास शेरूला घेऊन बसले होते...शेरू अगदी नावाप्रमाणे त्यांच्या बाजूला सोफ्यावर ....एखाद्या वाघासारखा बसला होता आणि बाबाराव त्यांच्या पाठीवरून मानेवरून त्याला कुरवाळत होते....राम ने बघितले की लीला ह्या बाहेर बंगल्याच्या परिसरात काही झाडांविषयी आणि नवीन लावलेल्या रोपांविषयी तेथे काम करणाऱ्या माणसांना समजावून सांगत आहेत काहीतरी....आणि सोबतच रोपांना पाणीसुद्धा देत आहेत....रामला बाबाराव यांच्या असणाऱ्या मूडचा अंदाज येत नव्हता.तो हळूच बाबाराव यांना