प्रायश्चित्त

प्रायश्चित        तो भिक्षा मागून आपलं पोट भरीत होता.नव्हे तर माधुकरी मागणं त्याच्या आयुष्याचा भाग बनला होता.आयुष्य सुंदर होतं.पण त्या आयुष्यात त्याला हेही दिवस उपभोगायला मिळाले होते.       मोहन व गीता हे पती पत्नी होते.त्यांचं जीवन आणि एकंदर संसार सुखी चालला होता.त्यांना एक दहा वर्षाची मुलगीही होती.तिचं नाव अमीषा होतं.पण अचानक त्यांच्या संसाराला कोणाची दृष्ट लागली कोणास ठाऊक?पतीचा एक मालवाहू वाहनाने अपघात झाला.तो पलंगाच्या आहारी गेला.त्याला उठणे बसणे महाग झाले.घरी करमेनासे झाले.घरी होता नव्हता सर्व पैसा उपचारात नष्ट झाला.आता मात्र त्याच्यावर आत्महत्येची पाळी आली.नशीब बलवत्तर होतं म्हणून तो वाचला.पण अंगूपंगू बनून.        गीता आता कामाला