मनात आलेल्या प्रत्येक भावनेला एकच प्रश्न विचारायचा की, तुला जे खरं वाटतंय" तेच खर आहे का? आणि तेवढेच खर आहे का? का याही पलीकडे अजून काहीतरी विश्व आहे. ज्या विश्वाच्या दुनियेत अजून आम्ही प्रवेश केलेला नाही. त्या आकाशातल्या ग्रहताऱ्यासारख आमच आयुष्य एका धाग्याच्या दोऱ्याने कुणीतरी गुरुफुटून टाकतय. आणि आम्ही त्या गुरफटलेल्या धाग्यात आयुष्यभरासाठी कैद होऊन जातोय. एखाद्या गुन्हेगाराला दिलेल्या कठोर शिक्षेप्रमाणे आम्ही आमचं आयुष्य आमच्याच हाताने व्यापून टाकतो. आमच्या भावनिकतेच्या भावनेला खोटी भुरळ घा