जात नष्ट करणे आहे? *जात अस्तित्वात आली कामावरुन. कामाची आखणी केली गेली व त्या कामानुसार कामाचं वर्गीकरण झालं. त्यातच विशिष्ट कामाची माणसं लवकर ओळखायला यावीत. म्हणून जात निर्माण झाली. ज्यात सुरुवातीला जातीजातीतील भेदभाव नव्हता. ज्यात विटाळही नव्हता. परंतु कालांतरानं त्यात विटाळ व भेदभाव शिरला. ज्यातून सामान्य माणसांचे जीवन जगणे असह्य झाले होते. हे सर्व स्वार्थापायी झालं होतं. विशिष्ट वर्गानं आपली अक्कलहुशारी वापरुन आपल्या बिरादरीला सुख भोगता यावं म्हणून निर्माण झालेल्या जातीचा वापर कलुषीतता निर्माण करण्यासाठी केला. आजही करीत आहे. म्हणूनच जात नष्ट करणे आहे.* जात...... जी जात नाही, ती जात. जातीवरुन विटाळ अस्तित्वात