(स्वरा अद्वैतची लाईव्ह रोमँटिक मुव्ही ....) त्याने स्वराला मोठ्या प्रेमाने समजावलं होत आणि स्वरा त्याच्या गोष्टी समाजातही होती. हो, तिला वेळ लागणार होता. आजपर्यंत कधीही कुटूंबात राहिलीच नव्हती . ज्या वेळी मुलाला आई-वडिलांची सर्वात जास्त गरज असते, त्याच वेळी तिला हॉस्टेलमध्ये पाठवलं गेलं होत. आणि जेव्हा १४ वर्षांनंतर परतली, तेव्हा तीच आयुष्य एकदम बदललं होत. पण हा बदल चांगला होता,जो तिला दिसत होता.