अनुबंध बंधनाचे.....( भाग ३४ )त्या भेटीनंतर पुढचे काही दिवस असेच निघुन जातात. प्रेमला प्रॉमिस केल्यामुळे अंजली पण स्वतःला थोडं अभ्यासात गुंतवुन घेते. अकरावीची परीक्षा जवळ आलेली असते, ती खुप मन लाऊन अभ्यास करते आणि चांगल्या मार्कांनी पास होते. त्यामुळे घरात सर्वजण तिचे कौतुक करतात. मागील तीन महिन्यात ती प्रेमला एकदाही भेटली नव्हती. खुप वेळा तिने प्रेमला भेटण्यासाठी बोलवलं पण त्याने सरळ नकार दिला. परीक्षा होईपर्यंत आणि त्याचा रिझल्ट लागेपर्यंत आपण भेटायचं नाही असं त्याने ठरवलं होतं. अंजलीच्या मनावरचं एक ओझं कमी झाले होते. आणि आता ती प्रेमला भेटू शकत होती.या दरम्यान प्रेमला पण तिची खुप आठवण येत होती. तिला फक्त लांबुन पाहण्यासाठी