सोबत आणलेले तेल त्यांनी घराच्या चौहोबाजूला शिंपडले. दुसऱ्यांनी मशालीने त्या घराला आग लावली , बघता बघता घर आगीच्या लोंढ्यात समावू लागले.अचानक घराचे दार उघडले गेले. दारात श्वेतकमल व त्याची बायको कमळा उभी होती . गावकरी आपल्या भेदक नजरेने त्यांच्याकडे बघत होते . श्वेतकमल पायऱ्या उतरून खाली आला. त्याने एक नजर आपल्या पेटत असलेल्या घरावर टाकली व परत ती गावकऱ्यांवर रोखली ."तुम्हाला काय वाटते , तुम्ही मला सहजरीत्या मारू शकता , नाही... तुम्ही माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही", श्वेतकमल ओरडतच सर्व गावकऱ्याना म्हणाला. श्वेकमलने आपले डोळे बंद केले आणि तो काही मंत्र उच्चारू लागला , त्याचबरोबर वातावरणात