तू हवीशी मला ....... भाग 5

  • 510
  • 177

(प्रियाची इन्फॉरमेशन ....)                                २० मिनिटांनी विवानही तयार होऊन खाली आला ... त्याच तोड अजूनही फुगलेलं होत... विवानने प्रियाकडे एकटक पाहिलं जी त्याच्याकडे मोठ्या डोळ्यांनी रागाने पाहत होती..... विवानने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि खुर्ची ओढून त्यावर बसला.... प्रिया आणि आजी येऊन बसल्या.... प्रिया अजूनही विवानकडे बघत होती आणि त्याच्या शेजारी बसली होती.... विवानने बघितल्यावर विचारलं"आता माझ्याकडे का बघत आहेस...?माझ्या चेहऱ्याचे आधीच बारा वाजलेत... किती कष्टाने साफ केला मी.... आता अजून काही उरलं आहे का...?"प्रियाने त्याच्याकडे रोखून पाहत थेट विचारलं"हि सोना कोण आहे... तुझी नवीन छिपकली ..."विवानने घेतलेल्या घास त्याच्या घशात अडकला