बरसुनी आले रंग प्रीतीचे - 3

"वाहिनी खूप गोड दिसतेय ...." सुर्ष्टी ने बोट मोडत तिची नजर काढली ... आरश्यासमोर बसलेल्या प्रणिती ची नजर खालीच होती.... खर्च ती आज एखादी राजकुमारी दिसत होती.... हिरवी साडी .... केसाचा अंबाडा ..... हातात हिरव्या बांगड्या ..... गळ्यात हार हार आणि त्याच्यावर diamond च मंगळसूत्र ... जे तिने स्वतःच जबरदस्ती काल घातलं होत.... तिच्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंब खाली पडला..... "प्रणिती ... झाली का तयारी बेटा ....."मॉम बोलतच रूममध्ये आल्या.... आणि तिला बघून शांतच झाल्या... तिच्याजवळ येत त्यांनी स्वतःच्या डोळ्यातलं काजळ तिच्या कानामागे लावलं... "ओह्ह्फो .... काकी ... मी आह वाहिनीची नजर काढली...."सृष्टी "असू दे ग... एवढी गोड दिसतेय कि कितीही वेळा नजर काढली तरी कमीच