माहेरचा गोडवा

  • 429
  • 147

माहेरचा गोडवा         गोविंदा आज म्हातारा झाला होता.त्याला चालता फिरता येत जरी नसलं तरी त्याचं डोकं जाग्यावर होतं.त्याची स्मृती अजून गेलेली नव्हती.ती अजूनही शाबूत होती.नव्हे तर तो आपल्या बुद्धीनं आजही विचार करु शकत होता.         त्याला आपल्या मुलीबद्दल गर्व होता.त्याचं स्वप्न होतं की आपली मुलगी वकील बनून समाजातील जे दुर्बल घटक आहेत.त्यांची सेवा करावी.ते स्वप्न साकार झालं होतं.कारण त्याची मुलगी वकील बनली होती.ती लढत होती अन्यायाविरुद्ध.जे कोणी अन्याय आणि अत्याचार करीत होते अबलांवर.          तो तसा खुश होता.पण त्यालाही दुःख व्हायचं.जेव्हा तो भुतकाळ आठवायचा.त्याची मुलगी नयना आणि कांता अशाच अत्याचाराच्या शिकार बनल्या होत्या.