दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 6

जंगलाच्या दिशेने चालत आलेली साधिका एक क्षण डोळे मिटून एक मंत्र पुटपुटते. क्षणात एक सोनेरी रंगाचा दरवाजा प्रकट होताच ती त्यात प्रवेश करते. समोर दिमाखात उभा असलेला टोलेजंग वाडा पाहून तिच्या चेहऱ्यावर एक हासू पसरते. वाड्यात प्रवेश करताच दत्तात्रेयांचे नामस्मरण करणारा एक तिच्या कानावर आवाज पडतो आणि ती त्या आवाजाच्या दिशेने जाते. नामस्मरणात गुंग असलेला तो तेजपुंज चेहरा पाहून तिला प्रसन्नता जाणवते. तिची चाहूल लागताच तो तेजपुंज चेहरा तिच्याकडे वळतो आणि साधिका त्या व्यक्तीला मिठी मारते. साधिका : आजोबा, कसे आहात तुम्ही? आजोबा : नेहमीच तर भेटतेस साधनेच्या मार्फत... आणि भेटलीस का हा प्रश्न विचारतेस... काय बोलावं...तुला यायला उशीर का झाला? साधिका : अहो, एक व्यक्ती माझा पाठलाग करत