.नेहा अग्रवाल ..आणी सौरभ पांडे हे नुकतेच बँकेत जॉइन झालेले दोन प्रोबेशनरी ऑफिसर्स दोघेही बिहारी .पाटना शहराचे रहिवासी सौरभ अजून अविवाहित तर नेहाचे नुकतेच लग्न झालेले तीचे पती पुण्यात नोकरीस तर सारे कुटुंब बिहार मध्ये स्थायिक एकंदर कोल्हापूर पासून खुपच दूर ..उत्तर भारतीय किंवा बिहारी बँकेत असणे ही आता आमच्या साठी काही नवीन गोष्ट नाही या पूर्वी पण “राहुल "म्हणून आमच्या कडे ऑफिसर होताच तो तर “मिर्झाचौकी ..येथून आला होता त्याला घरी जायला पण अख्खे दोन दिवस विमानाने लागत असत तो नुकताच पुढचे प्रमोशन घेवून गेला आणी नंतर हे दोघे आले खरे तर दोघेही माझ्या मुलाच्या आसपासच्या वयाची पण माझा स्वभाव पण मिळून मिसळून राहणारा असल्याने चेष्टा मस्करी .दंगा या मुळे ती