श्रापीत गाव.... - भाग 4

  • 603
  • 240

        कमलाकरने  आपले जड पडलेले डोळे कसेबसे उघडले . डोळ्यांसमोर अजूनही अंधारी होती. त्याने उठण्याचा प्रयत्न केला पण संपूर्ण शरीर दगडासारखे जड पडले होते.  हवेत एक प्रकारचा उग्र दर्प पसरला होता. अचानक कोणाचा तरी आवाज आला. कमलाकरने आपले डोळे तिकडे फिरवले तोच त्याला त्याचे आई-वडील बसलेले दिसले जे जोर जोरात मंत्र उच्चार करत होते. कमलाकरने संपूर्ण खोलीत नजर फिरवली तो हादरलाच.त्याच्या डोळ्यातून अश्रु ओंघळू लागले, तो रडक्या सुरात म्हणाला ,"  बाबा! हे सर्व काय आहे ? आपण असे कसे करू शकता ?" श्वेतकमलने खाडकन आपले डोळे उघडले. तो जागचा उठला व समोरच पडलेला एक रक्ताळलेला खंडग उचलला.