स्वयंपाकघरातील सुहृद

  • 447
  • 108

सुहृद म्हणजे आपल्या ह्रदयाच्या अगदी जवळचा.. हो..पातेली ,सतेली ,तामली,डेचकी ,तपेली,वेड भांडे ,तसराळी,घमेले ,गडू, तांब्या ,टीप,पिपं,घागर ,बादली,हंडा कळशी ,किती तरी अशी नावे भांड्यांची .ही भांडी म्हणजेच बाईचे सुहृदभांडीकुंडी म्हणजे बाईचा जिव्हाळ्याचा विषय !स्वयपाकात रमणारी बाई भांड्यावर खूप प्रेम करते .भांड्याना प्रेमाने हाताळते .मला सुद्धा वेगवेगळया प्रकारची भांडी खूप आवडतात .घरात खूप भांडी असली तरी भांड्यांच्या दुकानात गेले की भांड्यांच्या प्रेमात पडायला होतच !आणि मग खरेदी अटळ!!!              माझ्या आजीला एक वेगळ घरातल भांड खूप आवडत असे .तिच्या नेहेमी वापरात असे. ती त्याला प्रेमाने वेडे भांडे म्हणत असे .आणि स्वत घासून पुसून ठेवत असे .नेहेमी घरची सारी खरकटी