अनुबंध बंधनाचे. - भाग 33

  • 684
  • 264

अनुबंध बंधनाचे.....( भाग ३३ )काल रात्री जागरण झाल्यामुळे आज प्रेम थोडा उशिराच उठला होता. कामावर जायला उशीर झाल्यामुळे घाईतच आवरून तो टिफीन घेऊन घराबाहेर पडला. थोड्या वेळातच तो कंपनीत पोचला, बाप्पाच्या फोटोला हार चढवून अगरबत्ती लाऊन सर्व काही ठिक होऊ दे असा आशीर्वाद मागत आपल्या रोजच्या कामाला सुरुवात केली.इकडे अंजली सुद्धा नेहमीप्रमाणे पहाटे लवकर उठून आवरून कॉलेजला निघुन आली होती. पण आज तिचे लेक्चर वरती लक्ष लागत नव्हते. कसेतरी सर्व लेक्चर अटेंड करून ती कॉलेज मधुन निघाली. सोबत मेघा आणि सॅड्रिक पण होते. त्या दोघांनाही या गोष्टीची कल्पना होती. पण आज सविस्तर तिच्याकडून जाणून घ्यायचे असे ठरवून ते दोघे तिला घेऊन