नियती - भाग 54

  • 1k
  • 429

भाग 54ती सर्व सुखाची आहुती देऊन त्याच्यासोबत आली होती.आज ती त्याची... खऱ्या अर्थाने धर्मपत्नी झाली होती...विचारांनी ती सद्गद होत आनंदी झाली.डोळे अश्रू पूर्ण होऊन समोरचे धूसर दिसत होते...आता तिला सुखावह मनस्थिती मुळे होणाऱ्या वेदना जाणवत नव्हत्या...फ्रेश होऊन ती धुंदीतच घरात आली...तर समोर तो..खाली बसून चहा गाळणीने गाळत होता ‌...आत मध्ये येताच त्याने तिला टॉवेल दिला... बेडवर बसवले आणि हातात गरम गरम चहाचा कप दिला. आणि हळूच तिच्या माथ्यावर ओठ टेकून तिला म्हणाला..."चहा पी छान .....गरम गरम आणि आराम कर... मी येतो जॉगिंग करून.."त्यावर तिने हसत मान डोलावली............आज जॉगिंग वरून आल्यानंतर....असाच तो बसला... मायरा मन लावून स्वयंपाक करत होती... तर  एकटक पहात