सण दिवाळीचा: आठवणींचा दीपोत्सव

  • 975
  • 390

परवा मी दुबईत माझ्या जुन्या बुर दुबईतील इमारतीत गेलो होतो. दुबईतील बुर दुबई हा नेहमीच गजबजलेला आणि लोकांनी भरलेला परिसर आहे. या भागाला ‘जुनी दुबई’ असंही म्हणतात. येथे भारतीयांची मोठी वस्ती असून, जवळच मीना बाजार नावाची बाजारपेठ आहे. मीना बाजारमध्ये गेलं की आपण भारतातच आहोत असं वाटतं. इथे ड्राय फ्रूट्स, चॉकलेट्स, कपडे, भारतीय ज्वेलर्सची सोनेरी दुकानं, भारतीय हॉटेल्स आणि बरेच काही मिळतं. मला तर वाटतं की मीना बाजार म्हणजे दुबईतील दुसरी ‘तुळशीबाग’च! एकदा का लेडीज बुर दुबईत गेल्या की त्या मोकळ्या हाताने परत येत नाहीत; इथे खरेदीसाठी खूप पर्याय आहेत. दुबईमध्ये या ठिकाणी दिवाळी खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.