शान संजनाच्या जवळ येतो आणि तिचे दोन्ही हात धरून तिच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहू लागतो..... संजनाहि त्याला पाहून हसत होती..... शान तिचा चेहरा हातात धरतो आणि म्हणतो" मला अजूनही विश्वास बसत नाही आहे कि आज मी जिच्यावर प्रेम करतो तिच्याशी मी लग्न करणार आहे... हे स्वप्न तर नाहीये ना संजना....?"हे ऐकून संजना त्याच्याकडे बघते आणि मग त्याचा हातावर जोरात चिलटीत घेते.... त्यामुळे शान ओरडतो "आ आ संजना काय करत आहेस....?"संजना हस्ते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते" हे स्वप्न नाही तर हकीकत आहे याची जाणीव करून देण्यासाठी......"शान हसतो आणि तिला जवळ ओढतो आणि तिच्या डोळ्यात पाहतो आणि प्रेमाने म्हणतो"हो मला समजलं