श्रापीत गाव.... - भाग 2

  • 1.3k
  • 750

  आता वाचनेच शक्य नव्हते कारण समोरच अंशी नव्वद च्या आसपास तुटलेल्या डोक्यांची प्रते उभी होती .त्यातील दोघांकडे सखाराम चे लक्ष गेले , त्यांच्यात हळुहळू बदल घडू लागले . त्यांच्या शरीरावरील रक्त नाहीसे झाले , धडावरती मान सुध्दा प्रगटली . सखारामच्या समोरच एक देखणा तरुण व एक सुंदर तरुणी उभे ठाकले . सखाराम चे लक्ष त्याच्यावरच खिळले होते. त्या तरुणाचा वेस एखाद्या ब्राम्हनासारखा होता ,नव्हे तर तो एक ब्राम्हणच होता . डोक्याची टक्कल आणि मध्येच एक लांब शेंडी होती,त्याचा रेखीव चेहरा नी गळ्यात व बाहू वरती रुद्राक्षाच्या माळा होत्या.तो देखणा तरुण ब्राम्हण , घाबरलेल्या सखाराम ला म्हणाला ," घाबरू नकोस