अनुबंध बंधनाचे. - भाग 32

  • 1.9k
  • 1.1k

अनुबंध बंधनाचे.....( भाग ३२ )काल रात्री घडलेल्या घटनेमुळे अंजली रात्रभर झोपली नव्हती. इकडे प्रेमची स्थिती काही वेगळी नव्हती. तो पण हाच विचार करून रात्रभर झोपला नव्हता. या दिवसाची पहाट जरा वेगळीच होती. पुढे काय होणार होते याची दोघांनाही भीती वाटत होती.सकाळी उठल्यावर प्रेम सर्व आवरून घराबाहेर पडला. आणि जवळच असलेल्या साई बाबांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेऊन तो तिथेच एकांतात विचार करत बसला होता. आज दसरा असल्यामुळे त्याला सुट्टी होती. आणि आज देवीचे विसर्जन होते. त्यामुळे संध्याकाळी पुन्हा तिकडे जावं लागणार होतं. पण कालच्या घटनेमुळे तिकडे जावं की नको, असा विचार त्याच्या डोक्यात येत होता. अंजलीच्या घरी खुप काही झाले होते. काल रात्री