सावित्रीबाई एक झंझावात? *आज तीन जानेवारी. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले हे एक वादळच होतं त्या काळातील. ज्या काळात स्री पुरुष भेदभाव शिगेला पोहोचला होता. ज्या काळात स्रियांना शिक्षणाचा हक्कं नव्हता आणि ज्या काळात त्या काळातील पुरुषसत्ताक पद्धतीनं शिक्षणाचा हक्कं नाकारला होता.* शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, असं बाबासाहेबांनी म्हटलं. त्यानंतरच्या अनेक विचारवंतांनी शिक्षणाबद्दलच्या अनेक व्याख्या केल्या. आपआपले विचार मांडले. परंतु खरं शिक्षण म्हणजे काय? हे या दांपत्यांनी व्याख्या न करता कृतीतून दाखवून दिलं. तो काळ तसा बालविवाहाचाच होता व अगदी बाल्यावस्थेत सावित्रीबाई असतांना तिच्याशी