महेंद्र प्रताप च बोलणं ऐकून सावित्री हि हसत हसत नयना श्लोक आणि रुद्र कडे पाहू लागतात..... आता पुढे....... इगेजमेंटनंतर सर्व पाहुणे जेवायला जातात..... तिथे नयना श्लोकांसाठी गार्डन मध्ये वेगळी खुर्ची आणि टेबल ठेवला होता... त्यात त्या दोघांना बसायचं होत.... बाकीचे पाहुणे दुसऱ्या बाजूला बसणार होते... नयना आणि श्लोक याना त्या टेबलाजवळ बसवलं.... काही वेळानंतर... सर्वजण जेवत होते... रुद्र सुद्धा श्रेयाला प्रेमाने खाऊ घालत होता.... आणि श्रेया सुद्धा हसत हसत प्रेमाने त्याच्या हातातून खात होती... मग तिची नजर दुसरीकडे बसलेल्या नयना आणि श्लोक कडे गेली नयना शांत बसली होती आणि श्लोक तिच्याकडे बघत होता..... त्याच्या समोर जेवण ठेवलं होत पण दोघांनी एक घास हि खाल्ला