रात्रीची वेळ.... रात्री जेवणाच्या टेबलवर सगळे हजर होते.... पण रुद्र रूम मध्ये होता.... श्रेया सगळ्यांच्या ताडात जेवण वाढत होती तेव्हा अवन्तिक श्रेयाला म्हणाल्या " श्रेया रुद्र कुठे आहे.... तो जेवणार नाही का...?"हे ऐकून श्रेया म्हणते" मला माहित नाही आई त्यांना काय झालं आहे ... ते संध्याकळपासून रूमला लॉक लावून आत काहीतरी करत आहे.... मी किती वेळ विचारलं तर ते मला सांगत आहेत कि ते काही महत्त्वाच काम करत आहे आणि म्हणून दार उघडू शकत नाही... मी त्यांना जाऊन घेऊन येते..."असं म्हणत ती वळणारच तिला रुद्र पायर्यांवरून येताना दिसला.... रुद्रला येताना पाहून श्रेया अवन्तिकाला म्हणते" आई रुद्र आलेत....."घरातील सर्व सदस्य रुद्रकडे पाहतात