पटली नाही सरू

  • 615
  • 195

म्हणता म्हणता वर्ष गेलं,पटली नाही सरू।अन थर्टी फर्स्ट च्या पार्टीत तिले,प्रपोज म्हटलं करू।सावधतेनं घेऊ म्हटलं,स्वभाव तिचा पोळका होता।तिच्याभोवती मैत्रिणींचा,सजलेला घोळका होता।मित्राले म्हटलं मग,कसं जाऊ तिथी?बस करून जा म्हणे,बाळगू नको भीती।गांभीर्यानं घे म्हटलं,मजाक नाही सुरू।अन थर्टी फर्स्ट च्या पार्टीत तिले,प्रपोज म्हटलं करू।संधी शोधून शोधून,गुलाब गेला सुकुन।एक पोट्टी समोरून,धडकली मले चुकून।इट्स ओके म्हणता म्हणता,थोडा गुलाब झाला पुढी।हसली गोड गालात ती,लाजली होती थोडी।एका हाताने डोळे झाकत,ती गुलाब लागली धरू।अन थर्टी फर्स्ट च्या पार्टीत म्हटलं,प्रपोज तिले करू।गुलाब घेऊन माझा ती,लाजत थोडी पळाली।हे बघून घोळक्यातली,सरू तिच्यावर जळाली।सरू नाही भेटली तरी,नवीन पोट्टी पटली मले।तिच्यासोबत बोलायची,टॅक आता गठली मले।नव्या वर्षापासून म्हणे,चोरून चोरून भेटू।वावरात असलास तू तर,कूप कोरून