दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 4

  • 2.1k
  • 1.4k

आरती आणि अजित जेवतानासुध्दा भूतकाळात घडलेल्या घटनेच्या विचाराने अस्वस्थ झाले. इतकी वर्ष लोटली मात्र त्या घटनेचे पडसाद अजूनही त्यांच्या मनावर तसेच आहेत. अभिमन्यू जेवत असताना या दोघांचे निरीक्षण करतो. त्या दोघांच्या असं अवस्थ होण्याने काही तरी भयानक घडून गेल्याची जाणीव त्याला होते. जेवणे वैगरे आटोपल्यावरही त्या दोघांना असं शांत पाहून अभिमन्यू स्वतःचं बोलायला सुरुवात करतो."आई - बाबा, तुम्ही दोघे एवढे अस्वस्थ का झाला आहात? तुम्हाला ती घटना सांगताना त्रास होणार असेल तर नका सांगू" अभिमन्यू. "हे बघ राजा, आजा ना उद्या आम्हाला तुला ही गोष्ट सांगावी लागेलच ना? आणि तसंही आम्ही सगळं तुला सांगणार होतो. फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतो"