साधिकाने केलेला खुलासा ऐकून सर्वांनाच धक्का बसतो तर, सुरज चकित होतो आणि एक विचार त्याच्या मनात चमकतो. तो साधिका काय सांगते आहे हे शांतपणे ऐकू लागतो. साधिका : सुरज मी जे बोलले ते खरं आहे ना? सुरज : हो ताई... माधव : म्हणजे तुला हा येणार आहे हे आधीच माहिती होतं... साधिका : हो आज सकाळी मी नेहमीप्रमाणे ध्यानाला बसले होते. अशातच मला सुदामा काका जे गीत म्हणायचे ते ऐकू आलं. मला तेव्हा असं वाटलं की त्यांच्याशी संबंधित असं काहीतरी घडणार आहे... आणि माझ्या गुरुंना याविषयी मी सांगितलं. त्यांनी आज एक मुलगा येणार आहे त्याला तुमच्यासोबत काम करायची परवानगी द्यायची असं सांगितलं...आणि जेव्हा मी