आर्या आता वैतागून गेली होती . तिची चीड चीड होत होती . म्हणून अनुराग ने घाई घाई मध्ये डॉक्टर सोबत बोलून घेतले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रिपोर्ट आल्यानंतरच आपण बोलूया. असा उद्देश दिसत होता . श्वेता , अनुराग , आर्या आणि आजी, आजोबा सगळे घरी जाण्यासाठी निघाले .घरी जात असताना आर्या श्वेता च्या कुशी मध्ये झोपी गेली . श्वेता थोडी तिच्या काळजी ने अनेक विचारांमध्ये गुंतली होती. अनुराग आणि हीचे आई वडील ही काळजी मध्येच होते . म्हणून कोणी कोणासोबत बोलत नव्हते . श्वेताच्या आई ने पुढे होऊन सगळ्यांना विचारलं,' जेवणासाठी काय बनवू ?'सगळेच थकलेले होते आणि थोडे फार