अनुबंध बंधनाचे.....( भाग २९ )खुप वेळ झाला प्रेम तिथेच त्या गर्दीमधे तिच्या एका नजरेची वाट बघत होता. त्यांची प्रेयर झाल्यावर लगेच तिचे लक्ष दरवाज्याकडे गेले,,,,,,,प्रेमला वाटले आता तरी आपण तिला दिसू, पण त्याच क्षणी कोणीतरी एक मोठा फुलांचा बुके हातात घेऊन पुढे जात होते. त्यामुळे प्रेमचा चेहरा काही तिला नीटसा दिसला नाही.तो बुके घेऊन जाणारा सुटाबुटातील मुलगा आपल्या फॅमिली सोबत सरळ तिच्यापर्यंत पोचला. अंजलीच्या हातात तो फुलांचा बुके देऊन त्याने तिला हलकीशी मिठी मारत बर्थ डे विश केलं. त्याच्या आईने सोबत आणलेल्या एका छोट्याश्या बॅग मधुन एक गिफ्ट बाहेर काढले आणि तिला दिले. त्या मुलाने तिथेच ते गिफ्ट तिला ओपन करायला