माहेरची साडी

  • 459
  • 120

माहेर ची साडी ..**************बँकेत काम करताना जसे काम जबाबदारीचे असते तसेच रुटीन मध्ये काही गमती जमती पण घडत असतात .कामे तर चालूच असतात पण आपण पण त्या गमतींचा आनंद घ्यायचा असतो असाच एक गर्दीचा वार “सोमवार “बँकेत पाय टाकताच क्षणी समजते आज अगदी धुवाधार काम आहे ते ..हळू हळू कामाला सुरवात झाली ..अचानक गर्दी आणखीन वाढू लागली आता बँकेत अगदी मुंगी पण शिरायला जागा नव्हती मी प्रत्येक पैसे काढणाऱ्या स्लीप वरचे नाव वाचून पुकारा करीत होते तीच व्यक्ती पैसे न्यायला आलीय ना...कित्येक वेळा सहीऐवजी जर अंगठा केला असेल तर मात्र ती व्यक्ती खरेच आली आहे की नाही याची खात्री त्या व्यक्तीला समोर बोलावून करावी लागत असे त्यात