नियती - भाग 46

  • 1.5k
  • 714

भाग 46तिने एका झटक्यात त्याला ढकलून दिले आणि पटकन उठली. जॅक हातपाय झाडत पडला जागेवर..... त्याच्या तोंडातून किंचितही आवाज निघत नव्हता..... पण संपूर्ण शरीर तडफड करत होते ....संबंध खोली पूर्ण रक्ताने भरू लागली...हे असं भयानक दृश्य पाहून मायराला चक्कर आल्यासारखे वाटले आणि तशाच अवस्थेत.....मग...ती भिंतीला पकडून उठली. अंगावरती ....वरचा जो कूर्ता तिचा फाटलेला होता... त्यासाठी आता काय करायचे ...??हा विचार करू लागली....पण तिला जास्त वेळ विचार करता येणार नव्हते.यावेळी अगदी गडद अंधार आणि गडद रात्र होती....बाहेर कुत्रे भुंकत होते... रातकिडे  किर्र किर्र आवाज करत होते.कुणी उठायच्या आणि बाहेर येण्याच्या अगोदर तिलाकोणी पाहण्याच्या अगोदर...... बाहेर पडणे भाग होते.मायराने आजूबाजूला पाहिले... तिला