हरतालिका

  • 1.3k
  • 600

हरतालिका व्रत करून पार्वतीने शिव शंकराला प्रसन्न करून घेतले होते .माझ्या माहेरी हरतालिकेचा उपास कडक नव्हता .आई खिचडी, दुध फळे असे काही खाऊन उपास करीत असे .मी अगदी हट्टाने अगदी निर्जळी उपास करीत असे .मी रात्री झोपी जात असे पण आई मात्र जागी राहून बारा वाजता मला उठवून दुध प्यायला देत असे .या हरतालिकेच्या दिवसाची एक आठवण मात्र कायम येतेच .नुकतीच मी नोकरीला लागले होते .अजुन लग्न व्हायचे होते .आणि ऑफिसकडून तीन महिन्याच्या ट्रेनिंगची ऑर्डर आली.मात्र हे ट्रेनिंग नाशिकला होते .आई वडील जरा बिचकले .ते दिवस "सातच्या आत घरात "या पठडीतले होते.मुलींवर बरीच बंधने असत.नाशिकला ना कोण ओळखीचे न नात्यातले .एकट्या