इत्तरांचा स्वभाव बदलता आला तर

  • 960
  • 303

मला इत्तरांचे स्वभाव बदलता आले असते तर...      'व्यक्ती तितक्या प्रकृती'अशी उक्ती आपल्याकडे सर्रास वापरली जाते.दैनंदिन आयुष्यात आपला विविध वृत्तीच्या, विविध प्रकारच्या लोकांशी काही ना काही संबंध येत असतो. त्यातल्या त्यात जो सरळमार्गी आहे त्याला तर अनेकदा आडमुठ्या स्वभावाच्या लोकांकडून खूप मनस्ताप सहन करावा लागतो.      सहज मनात विचार आला की मला एखादी दिव्य शक्ती मिळाली आणि इत्तरांचे स्वभाव हवे तसे बदलता आले तर...    साधारणपणे आपण बघतो की आपल्या संपर्कात ज्या व्यक्ती येतात त्यापैकी ज्या व्यक्ती आपल्याला हवे, आपल्याला जसे आवडते तसे वागल्या तर अशा व्यक्ती आपल्या अत्यंत आवडत्या असतात,तर ज्यांचे आपल्याशी जमत नाही, त्यांचे स्वभाव व त्यांची