जांभळीचा साणा

  • 3.3k
  • 3
  • 1.2k

जांभळीचा साणा           अच्युतरावांचा निरोप सांगायला शिपाई भिकु गोताड परटवण्यात बाबा भिशांच्या घरी गेला. त्यांचा मुलंगा घनःशाम नुकताच बी.एस्सी. झालेला. त्याला अच्युतरावानी भेटायला बोलावल म्हणजे पटवर्धन हायस्कूलमध्ये नोकरी संदर्भातच विचारणा होणार असं बाबा भिशांनी गृहित धरलं. त्याना शिक्षकी पेशाचा फार अभिमान वाटायचा. चहा घेता घेता त्यानी भिकुकडे खडा टाकला भिकु अच्युतरावांच्या खास मर्जीतला. बऱ्याच आतल्या गोटातल्या बातम्या त्याला असायच्या पण तो नकारार्थी मान हालवित बोलला, “तसा काय माला वाटत नाय, कारण