नव्वद च्या दशकातील कोल्हापूरची खाद्ययात्रा माझी कोल्हापुरातील खाद्ययात्रा नव्वद च्या दशका आधीच म्हणजे लहानपणापासूनच सुरू झाली होती याचे कारण माझ्या वडिलांना असलेली चांगले चुंगले खाण्याची व हॉटेलिंगची आवडतेव्हा महाद्वार रोड ला सेंट्रल हॉटेल होते तिथं पातळ भाजी पावव मिसळ उत्तम मिळत असे वडील आवर्जून खायला नेत असततेथेच खाली पूर्वी एक फक्त बिस्किटांचे दुकान होतेवेग वेगळ्या प्रकारची आणि चवीची बिस्किटे गोलाकार बरणीत दुकानातील पायऱ्या पायऱ्या च्या मांडणीवर ठेवलेली असतवडील माझ्या मागणीप्रमाणे घेउन ती देत असत बिनखांबी गणपती पाशी विजय बेकरी होती तिथला पाव आणि खारी नेहेमी आणली जात असेभवानी मंडपात एका छोट्या हॉटेलातला मिळणारा गोड शिरा त्यांना आवडत असेआई भलेही किती चांगला शिरा घरी