ड्रायव्हर

  • 648
  • 198

ड्रायव्हर.... शिंगटेआण्णा म्हणजे ऑफिसातला एकदम अफलातून माणूस! इथे येण्यापूर्वी हवाई दलात शिपाई म्हणून पंधरा वर्षाची नोकरी करून आण्णा तिथून रिटायर झाला आणि एक्स सर्व्हिसमनसाठी राखीव असलेल्या कॅटेगरीमधे ड्रायव्हर म्हणून केंद्र सरकारच्या या खात्यात चिकटला.   एकंदरीत सगळ्याच सरकारी खात्यात तिथल्या मुख्य अधिकाऱ्यांच्या ड्रायव्हरचा फार म्हणजे फारच रूबाब असतो. कोणताही सरकारी अधिकारी कधीच त्याच्या ड्रायव्हरला दुखावत नाही,यामागे बरीच कारणे असतात आणि त्यातले महत्वाचे कारण असते ते म्हणजे...साहेब दिवसभरात कुठे कुठे फिरला,बाहेर कुणाकुणाला भेटला, हे सगळ त्याच्या ड्रायव्हरला माहीत असते. साहेबाने दिवसभरात भेट दिलेल्या ठिकाणांपैकी काही ठिकाणे साहेबाला कुणाला समजू द्यायची नसतात.ऑफिसच्या वेळेत आणि ऑफिसच्या खर्चाने करत असलेले काही उद्योग,वा अजून काही सिक्रेट्स ड्रायव्हरने