फुलपाखरू प्रभाव

  • 789
  • 264

अनु अकरा वाजल्यापासून वैभव ची वाट बघत आहे. आता दुपारचे तीन वाजायला येत आहे, पण अजून वैभवचा ठावठिकाण नाही. अनु वैभवला बोलवायला जवळपास शंभरेक मिस कॉल लावले असतील, दीडशेच्या वर म्यासेज टाकले असतील, पण एवढे असूनही वैभवने तिला काही रिस्पॉन्स दिला नाही वा तिचा फोन उचलला नाही. अनुला वाटू लागले होते की, "आता बस्स झालं, आता आपल्याला जायला हवं, सलग चार तास रेस्टॉरंट मध्ये, कुठलीच मुलगी आपल्या बॉयफ्रेंड ची वाट बघत नसावी, तेही एकटी!, हा कहरच झालाय, इनफ इज इनफ!, आता त्याने किती ही सॉरी म्हटले, किंवा आपले लाळ पुरविले तरी त्याला माफ करायचे नाही. चार तास फुकट वाया गेलेत,