अनुबंध बंधनाचे. - भाग 25

  • 2.1k
  • 1.3k

अनुबंध बंधनाचे.....( भाग २५ )आज प्रेमचा वाढदिवस होता. आजपर्यंत मित्रांसोबत खुप वेळा पार्ट्या करून वाढदिवस साजरा करत होता. पण गेल्या दोन तीन वर्षापासून त्याचा वाढदिवस अगदी स्पेशल सेलिब्रेट होत होता. कारण आता त्याच्या आयुष्यात अंजली होती.यावेळी तिने काहीतरी वेगळं ठरवलं होतं. त्यासाठी आधीपासूनच तिने सर्व प्लॅनिंग करून ठेवले होते. आणि प्रेमला त्या दिवशी सुट्टी घ्यायला सांगितली होती. यावेळी मॉम ना सुध्दा खरं तेच बोलुन म्हणजे, "प्रेमचा वाढदिवस आहे, आणि मी त्याच्यासोबत गेट वे ला जाणार आहे, आणि येताना शॉपिंग पण करून येईन" असं बोलून त्यांच्याकडून परमिशन पण घेतली होती. मॉम नी तिला काही पैसे पण दिले होते, त्याच्यासाठी छान काहीतरी