कर्म - गीतारहस्य - 3

  • 3.1k
  • 1.7k

"कर्म ". गीता रहस्य.ज्ञानानें आणि श्रद्धेनें, पण त्यांतल्या त्यांतहि विशेषेकरून भक्तीच्या सुलभ राजमार्गानें, बुद्धि होईल तितकी सम करून प्रत्येकानें लोक- संग्रहार्थ स्वधर्माप्रमाणें आपआपलीं कर्मे निष्काम बुद्धीनें आमरणान्त करीत रहाणें हेंच त्याचे परम कर्तव्य असून, त्यांतच त्याचे इहलौकिक व पारलौकिक कल्याण आहे, मोक्षप्राप्तीसाठीं कर्मे सोडण्याची किंवा दुसरें कोणतेंहि अनुष्ठान करण्याची जरूर नाहीं, हा सर्व गीताशास्त्राचा फलितार्थ होय. -लोकमान्य टिळक.ज्ञानी पुरुषांनी लोकांना ज्ञान देऊन शहाणे करावे.लोकांना सदाचरणाची सवय लागलेली नसते , त्यांना ज्ञान झाल्यानंतर ते आपल्या गैरवर्तनाच्या समर्थनार्थ त्याचा उपयोग करतात. ज्ञानी पुरुषांनी आपण स्वतः संसारात राहून लोकांना निष्काम कर्माचा म्हणजे सदाचरणाचा धडा घालून देऊन त्याप्रमाणे त्यांच्याकडून आचरण करून घेणे हे त्यांचे