क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 24

  • 732
  • 240

महादेव महिमा भाग 3 2001अमरची लघुशंका उरकून झाली होती - त्याने पैंट वर केली- आणी लागलीच घरात जाण्यासाठी पाठमोरा वळला         आणी जसा पाठमोरा वळला , मागून म्हातारलेला खर्जातल्या आवाजातली हाक आली..        " अ..म....र...!"  तो खर्जातला घोगरा आवाज ऐकताच.. अमरच्या  मणक्यातून थंडगार बर्फाची लाट पसरली, सर्व शरीर काठीसारख ताठरल..गेल..        अमरच्या एका खांद्यामागून वीस पावळांवरचा चंद्राच्या निळसर उजेडात बुडालेला आवार, आणी आवारातला तो पेरुचा झाड दिसत होता , ज्या झाडावरच्या एका फांदीवर , काळया लुगड्यातल्या धनूआज्जीच , पिंजारलेल्या पांढ-या केसांच प्रेत बसल होत..         अंधारात धनूआज्जीच्या डोळ्यांतले बुभळांचे कवडसे पिवळ्याजर्द प्रकाशाने चमकत होते