क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 20

  • 741
  • 279

भाग ३         मंदा काकू नमिताबाईना धीर देण्याशिवाय काय करु शकत होत्या? शेवटी नवरा - बायकोच्या संसारात अशी छोठ मोठी  भांडण होत असतात  अस सांगून त्या निघुन गेल्या..         पण मंदाकाकूंना हे ठावूक नव्हत ,  की ही तर फक्त अशुभाच्या संकटाची वाळवी लागण्यापुर्वीची चाहुल आहे - सुरुवात आहे , पुढे पुढे तर भयंकर घटना घडणार होत्या.        त्या दिवशी सुद्धा  विकासराव दारु पिऊन आले ,     दरवाज्यात ठेपाळले - कडीचा खडखड आवाज झाला.. !          तो आवाज ऐकून संध्याकाळच जेवण बनवणा-या  नमिता जराश्या घाईतच बाहेर आल्या.     त्या   एकटक मळूल नजरेने विकासरावांकडे पाहत होत्या