क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 16

भाग 16  भुल्या 2 !  भुल्या पायाखालचा रस्ता लाल  मातीचा होता , दोन्ही तर्फ  उन्हाच्या  झळ्यांनी सुकलेल हिरव गवत ,      जामिनदोस्त झालेल दिसत होत.         रातकीड्यांची किरकिर कानांत ऐकू येत होती- हळकीशी थंडी  अंगाला झोंबत होती, आजूबाजुला जरास माळरानच होत..          वा-याचा  व्हू व्हू घोंघावण्याचा आवाज कानी पडत होता.          हातातळ्या टॉर्चच्या पिवळसर उजेडात कचरुबा आपला मार्ग हेरत चालत निघाले होते..           टॉर्चच्या पिवळसर उजेडात खालची लाल माती , दिसत होती.            आजूबाजुला निर्मनुष्य भाग असल्याने , जमिनीवर रेंगाळणा-या किड़यांना फिरायला कसलेच बंधन उरले नव्हते -          पिवळ्या रंगाच्या