दोन अनुभव

  • 1.5k
  • 576

आपण आयुष्यात अनेक माणसांना भेटत असतो वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळी माणसे संपर्कात येत असतात तुमच्या चार गोड शब्दांनी किंवा तुमच्या आनंददायी सहवासाने सुद्धा माणसे तुमच्याकडे आकृष्ट होत असतात मात्र अशी सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडून त्यांना पोचली पाहिजे . मध्यंतरी नागपूरला टुर साठी गेलो होतो . एक बुद्ध मंदिर पाहायला वर्ध्याला गेलो दुपारी बारा एकची वेळ ऊन नुसते तळपत होते त्यात ते नागपूरचे ऊन एसी गाडीत सुद्धा ते आम्हाला दमवत होते !!देवळात शिरताना सहज बाजूला लक्ष गेले आणि मन प्रफुल्लित झाले आत एक बाग होती आणि मधोमध एक मोठे तळे अबोली रंगांच्या कमळांनी भरलेले होतेआदल्याच दिवशी अशा कमळांचा पॉट एके ठिकाणी पाहिला होता मी ..  तेव्हाच हा रंग खुप भावला होता