अनुबंध बंधनाचे. - भाग 21

(3.1k)
  • 6.6k
  • 4.7k

अनुबंध बंधनाचे.....( भाग २१ )प्रेम आतल्या रूम मधे झोपलेला असतो. पहाटेचे सात वाजलेले असतात. अंजली अंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन तयार पण झालेली असते. मॉम तिला प्रेमला उठवायला सांगतात तशी ती त्या रूम मधे येते. प्रेम गाढ झोपेत असतो. ती फक्त त्याला पहातच राहते. इकडे तिकडे बघुन हळुच ती त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या केसातुन हात फिरवत त्याच्या कपाळावर किस करते. तिचे ओले झालेले केस त्याच्या चेहऱ्यावर फिरत असतात. प्रेमला त्या सुखद स्पर्शाची जाणिव होते आणि त्याला जाग येते, तो डोळे उघडतो तर...अंजली अगदी त्याच्या चेहऱ्याजवळ होती. नकळत त्याचे दोन्ही हात तिच्या पाठीवर जातात आणि तिला तसच मिठीत घेतो. तिने मारलेल्या