आर्या... ( भाग ५ )

  • 2.8k
  • 1.8k

     श्वेता पहाटे सहा ला उठते . आर्या आणि अनुराग छान गाढ झोपेत असतात . ती थोड ही आवाज न करता तिची काम आवरून घेते. आता अनुराग चे आई वडील ही नव्हते . ते काही दिवसांपूर्वीच महत्वाच्या कामासाठी गावी गेले होते आणि खर तर या एकांतामुळेच श्वेता च्या मनात अनेक प्रश्न येत असत आणि आज त्यांची उत्तरे तिला भेटणार होती . एक दीड तासात ती काम आवरून हळूच अनुरागला आवाज देते आणि पुढे म्हणते , " चल पटकन आवरून घे तुझं ! त्याचा हात पकडत पुढे म्हणते अरे , हळू ! आर्याला हात लागेल ! तिला झोपू दे !