वाटमार्गी

  • 2.2k
  • 1
  • 807

वाटमार्गी       शिदु देवधराच्या तांबोळातल्या कलमाना आगप फूट दिसायला लागली. या गोष्टीची गावात बोलवा फुटली नी  कैरी, हापूस आंबा व्यापारीचकरा मारायला लागले. तांबोळ तासभर चालीच्या अंतरावर गावाच्या एका टोकाला, अर्ध्या मकाणा पर्यंत बैल गाडीचा रस्ता होता. तिथून माल काढून आणणे दुरापास्त. आलेले व्यापारी ही सगळी रड लावून चार- पाच रुपयाची बोली फोडीत.त्याच्यापुढे कोणच जायला तयार होईना नी रक्कमही सीझन पुरा झाल्यावर द्यायची अट घालीत . तिथे  दोनशे कलम होती नी फूट घावूक  आहे  हीगोष्ट भाऊ – बाबुंच्या  कानावर गेली. हे जुळेभाऊ गावातले  सधन  नी  चारपैसे  बाळगून  असणारे पतवान  म्हणून ओळखले जात. त्याना बातमीकळल्यावर दोघानीही समक्ष खेप करून बागेवर नजर टाकली. फूट बघून त्यांचेही